कैलास खोट्टे जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी बहुल भागात असलेले पिंगळी बु. येथे शबरी माता जयंती साजरी करण्यात आली. यामध्ये सर्व प्रथम शबरी माता प्रतिमेचे पुष्प अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात शबरी माता ह्या कोण होत्या त्यांनी कशाप्रकारे रामाची भक्ती केली याबद्दल थोडक्यात माहिती देण्यात आली. यामध्ये राज भारसाकडे, तसलीम भारसाकडे,कपिल भारसाकडे व सर्व शबरी माता गणेश उत्सव मंडळ तसेच सर्व गावकरी कार्यक्रमाला उपस्थित होते.







