कैलास खोट्टे जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
संग्रामपूर तालुक्यातील श्री संत सोनाजी महाराज नगरी सोनाळा गाव मधील सोशल मिडिया ग्रुपची सर्वत्र चर्चा होत आहे.त्यामध्ये *“सोनाळयाचा गावगाडा”*,*“मित्र परीवार”,”संघर्ष अनाथ गरजूंचा”* हे ग्रुप सामाजिक उपक्रमात सदैव अग्रेसर असतात.एखादी कोणी गावासाठी युक्ती सुचवायची आणि सर्व गावकरी मिळून निधी गोळा करून ते कार्य पूर्ण करायचे या साठी सर्व गावातून विशेष सहकार्य असते.आपल्या परीने सर्व देणगी देत असतात.याच उपक्रमात “*शीत शव पेटी*” श्री संत सोनाजी सोनाळा महाराज ग्राम सोनाळा येथे उपलब्ध झालेली आहे. तसेच सर्व गावकरी मिळून प्रसिद्ध व्याख्याते प्रा. मा.वसंत हंकारे यांचा कार्यक्रम सुद्धा 4 फेब्रुवारी रोजी पि.एम.श्री.जिल्हा परिषद मुलांची शाळा सोनाळा येथे होत आहे.यासाठी सुद्धा गावकरी निधी गोळा करून सामाजिक कार्यात सहभाग घेत आहेत.यासाठी साठी पोलिस स्टेशन चे ठाणेदार संदीप काळे साहेब व सर्व पोलिस वृंद सहकार्य करीत आहेत हे विशेष.







