कैलास खोट्टे जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
संग्रामपूर तालुक्यातील टुनकी बु येथील जिल्हा परिषद केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक शाळा टुनकी बु. 02 एप्रिल बुधवार रोजी पालक सभा उत्साहात पार पडली. या पालक सभेला कौतुकास्पद उपक्रम विद्यार्थ्यांच्या भौतिक सुविधांसाठी विद्यार्थी पालक आनंदा कासोकार यांनी 1101 रु व माजी सरपंच व ग्रापं सदस्य राजेंद्र वानखडे यांनी 1101 रु वर्गणी देवून सहकार्य केले त्यानंतर काही मिनिटातच 20 हजार रुपये वर्गणी गोळा झाली . सदर कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित सर्व विद्यार्थी पालक मान्यवर मुख्याध्यापक श्री संजय इंगळे सर यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये शाळेचे मुख्याध्यापक श्री.संजय इंगळे सर यांनी पालक सभेच्या आयोजनाचे कारण आणि महत्व सांगितले, तर जेष्ठ शिक्षक श्री. संजय दामधर सर यांनी विद्यार्थ्यांच्या विकासात पालकांची, आईची भूमिका किती महत्वाची आहे हे समजावून सांगितले , थॉमस एडिसन या शास्त्रज्ञाची गोष्ट सांगून मुलांच्या मानसिक विकासाची महत्व सांगितली. तर सहाय्यक शिक्षक निलेश पवार सर यांनी निपुण भारत कार्यक्रम, पुढील वर्षीचे नियोजन, आणि इयत्ता 1 ली तील दाखलपात्र विद्यार्थी माहिती आणि माजी विद्यार्थी संघ स्थापनेविषयी माहिती उपस्थितांना सांगितली तर शाळेतील अभ्यासू शिक्षक रविंद्र चाटे सर यांनी मुलांच्या गृहपाठ विषयीच्या सूचना पालकांची जबाबदारी याविषयी पालकांसोबत संवाद साधला, कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या माजी सरपंच व ग्रापं सदस्य अभ्यासू व्यक्तिमत्व श्री.राजेंद्र वानखडे यांनी शाळेतील भौतिक सुविधेविषयी, जिल्हा परिषद विभागाच्या वतीने मान्य झालेल्या शाळेच्या नवीन वर्गखोली विषयी माहिती दिली तर शाळेतील शिक्षकांप्रमाणेच पालकांचीही खूप मोठी जबाबदारी विद्यार्थ्यांच्या बद्दल असल्याचे सांगितले ज्याप्रमाणे आपण गावातील कार्यक्रमा साठी गावातून वर्गणी गोळा करतो त्याचप्रमाणे शाळेच्या भौतिक सुविधेसाठी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आवश्यक ते सहकार्य करावे, आर्थिक मदत करायला हवी अशा स्तुत्य उपक्रमाची संकल्पना मांडून आवाहन केले त्यांच्या या आवाहनाला जागरुक विद्यार्थी पालक श्री.आनंदा कासोकार यांनी रोख ₹1101/- शाळेला देणगी देऊन सुरुवात केली, यानंतर पाहता पाहता उपस्थित बहुसंख्य पालकांनी 2 मिनिटांच्या कालावधीत ₹10000/- व शाळेतील शिक्षकांनी प्रत्येकी एक हजार रुपये रोख देत 20000 /- रुपये लोकवर्गणी गोळा झाली . त्यानंतर शाळेच्या वतीने व सरपंच पती श्री.राजेंद्र वानखडे यांनी वर्गणीची सुरुवात करून दिल्याबद्दल श्री. आनंदा कासोकार यांचे उपस्थित पालकांसह सामूहिक स्वागत करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.निलेश पवार सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.दामधर सर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळा मुख्याध्यापक इंगळे सर , जेष्ठ शिक्षक श्री.विश्वजित वक्ते सर, इप्रान सुरत्ने सर, सचिन कात्रे सर, कु. प्राजक्ता सातव मॅडम, कु.मनिषा इंगळे मॅडम आणि कु.श्रुती लाहोटी मॅडम यांनी मोलाचे सहकार्य.पालक सभेला मोठ्या संख्येने विद्यार्थी माता व पालक उपस्थित होते,”शाळा, शिक्षक, पालक आणि गाव सर्वांची साथ, तरच निश्चित आहे विद्यार्थी विकास” या भावनेसह पालकसभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात यशस्वी पार पडली.सावित्रीबाई फुले वेशभूषेत विद्यार्थिनींचे आकर्षण , पालक मेळाव्या दरम्यान चौथ्या वर्गातील पुनम पारस्कार , आरुषी पिंपळकार व कृष्णाली खुपसे या विद्यार्थिनींनी सावित्रीबाईच्या वेशभूषेत आरतीचे ताट घेऊन पालक व मान्यवरांचे कुंकू तिलक लावून स्वागत केले .







