कैलास खोट्टे जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
दिनांक 18 एप्रिल रोजी हॉटेल सेंटर पॉईंट नागपूर येथे आयोजित सरपंच कॉफी टेबल बुक प्रकाशन सोहळ्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामधील संग्रामपूर तालुक्यामधील विविध पुरस्कार प्राप्त आदर्श महिला सरपंच सौ प्रियंका राहुल मेटांगे यांना सुप्रसिद्ध अभिनेते मा. श्री.सचिन खेडेकर, नागपूर जिल्हा परिषद सीईओ मा. श्री. विनायक महामुनी यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला सकाळ गौरव गाथा या पुस्तकाचे विमोचन वरील मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.आपल्या सरपंच पदाच्या कार्यकाळात सरपंच सौ प्रियांका राहुल मेटांगे यांनी गावातील प्रत्येक घटकाला दिलेल्या न्यायाबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. यापूर्वी सुद्धा त्यांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.त्यांनी आपल्या कार्यकाळात सामान्य नागरिकांच्या गरजा, विज, पाणी पुरवठा यांचे योग्य नियोजन, गावातील अपंग व्यक्ती,शाळा, अंगणवाडी, कर्मचाऱ्यांबद्दल असलेली आपुलकी व त्यांचे केलेले नियमित पगार, गावात विविध शिबिर घेऊन नागरिकांना सर्वच गरजा पूर्ण केले आहेत, वेळोवेळी महिलांचे मेळावा घेऊन त्यांच्या सर्व समस्या ऐकून त्या सोडवण्याचा केलेले प्रयत्न, गावात स्मशानभूमी नाली बांधकाम सांडपाणी व्यवस्थापन, सिमेंट काँक्रिटीकरण, जनावरांविषयी असलेली आपुलकी, जनावरांसाठी घेतलेले विविध कॅम्प, गावातील शेतकऱ्यांसाठी विविध कॅम्प, गावातील व्यायाम शाळा, वाचनालय, यासाठी असलेले योगदान, यामुळे गावाचा चेहरा मोहरा बदलला असून या सर्वच गोष्टींच्या आधारावर त्यांना आज सन्मानित करण्यात आले आहे.आज मिळालेला पुरस्कार गावकऱ्यांचेरणी अर्पण, गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे आज गावात केलेल्या विकास कामांबद्दल मिळालेला पुरस्कार म्हणजे खूप अभिमानाची गोष्ट आहे, सदर विकास कामात नेहमी सहकार्य करणारे संग्रामपूर पंचायत समिती गटविकास अधिकारी माधव पायघन, गावाच्या विकासासाठी नेहमी कार्यरत असलेले सचिव हेमंत देशमुख, ग्रामपंचायत कर्मचारी अंगणवाडी सेविका मदतनीस, आशा वर्कर, व गावकरी मंडळी या सर्वांमुळे हा पुरस्कार मिळाला.सरपंच सौ. प्रियंका राहुल मेटांगे असे यांनी सांगितले.







