कैलास खोट्टे जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
ग्रामदैवत श्री संत सोनाजी महाराज यांच्या कृपेने आपल्या गावातील सुपुत्र डॉ. वैभव अशोकआप्पा घोडेस्वार यांना संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ,अमरावती येथे दिनांक २३ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडलेल्या दीक्षांत समारंभात इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विषयात पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली.
त्यांचा संशोधन विषय “Power Transmission Line Fault Detection and Classification Using Feature Extraction” असा असून, वीज वहन लाईनमधील बिघाड अचूक व जलद ओळखून त्याचे वर्गीकरण करण्याबाबत त्यांनी सखोल संशोधन केले आहे. या संशोधनामुळे विद्युत वितरण व्यवस्थेची कार्यक्षमता व सुरक्षितता अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे.ही बाब संपूर्ण गावासाठी विशेष अभिमानाची आहे की, आपल्या शेतकरी कुटुंबातील एक तरुण शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असून उच्च शिक्षणाच्या माध्यमातून गावाचे नाव उज्ज्वल करत आहे. त्यांच्या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची प्रेरणा मिळत आहे.
डॉ. घोडेस्वार यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, बंधू, पत्नी, कुटुंबीय तसेच कन्या गार्गी हिला दिले आहे. तसेच विशेष आभार माउली ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स शेगाव चे अध्यक्ष मा. श्री ज्ञानेश्वरजी दादा पाटील, मा. प्राचार्य डॉ. सी. एम. जाधव, पीएच.डी. मार्गदर्शक डॉ. एम. ए. बेग आणि सर्व हितचिंतक यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.याचबरोबर त्यांचे आजोबा कै. सदाशिव आप्पा कृष्णाप्पा घोडेस्वार यांनी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले असून, त्यांच्या संस्कारांचा वारसा पुढे नेत डॉ. वैभव घोडेस्वार शिक्षण व समाजकार्य क्षेत्रात कार्यरत आहेत, अशी भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली.डॉ. वैभव घोडेस्वार यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक, संशोधन व सामाजिक कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत. ही कामगिरी संपूर्ण गावासाठी अभिमानास्पद व प्रेरणादायी ठरली आहे.







