कैलास खोट्टे जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
आंतरराष्ट्रीय नामांकन (आय एस ओ 9001-2015) प्राप्त डिजिटल इंडिया प्रेस क्लब द्वारा आयोजित राज्यस्तरीय महाराष्ट्र एक्सलन्स अवार्ड 2026′ साठी *सोनाळा* येथील *अजिंक्य तिडके* यांची निवड करण्यात आली *कृषी* क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी *अजिंक्य तिडके* यांना हा अवार्ड प्रदान प्रदान करण्यात येणार आहे. डिजिटल प्रेस क्लब ऑफ इंडिया द्वारा सामाजिक उपक्रमाचा भाग म्हणून विविध क्षेत्रातील उल्लेखनीयकामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा सत्कार करण्यासाठी “राज्यस्तरीय महाराष्ट्र एक्सलन्स अवॉर्ड 2026 पुरस्काराचे” आयोजन करण्यात येते यामध्ये पत्रकारिता, शिक्षण,कृषी,साहित्य,सामाजिक, खेळ, राजकीय, सौंदर्य, डॉक्टर वकील , महिला, सहकार, पतसंस्था, कला, इत्यादी क्षेत्रात कर्तृत्व घडवणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येते. यामध्ये *सोनाळा* येथील *अजिंक्य तिडके* यांची कृषी क्षेत्रातील महाराष्ट्र एक्सलन्स अवॉर्ड 2026 पुरस्कारा साठी करण्यात आली असून बुधवार दिनांक 6 मे 2026 रोजी मलकापूर येथे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून तिथे मान्यवरांच्या हस्ते *अजिंक्य तिडके.* यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे







