कैलास खोट्टे जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
दिनांक 5 मार्च रोजी तुकाराम बीज च्या शुभ पर्वावर ग्रामपंचायतने केलेल्या श्री संत तुकाराम महाराज चौक व अंगणवाडी परिसराचा ह.भ.प.श्री ढोले महाराज यांच्या हस्ते व सोनाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री संदीप काळे साहेब तसेच वारकरी संप्रदायाचे भजन मंडळी, महिलावर्ग, तथा समस्त गावकऱ्यांच्या लक्षणीय उपस्थितीमध्ये लोकार्पण सोहळा पार पडला.ज्या ठिकाणी घनकचरा, अस्वच्छता होती त्या ठिकाणीग्रामपंचायत ने अतिशय सुंदर आकर्षक असे श्री संत तुकाराम महाराजांचे म्युरल रेखाटले असून अंगणवाडी परिसर स्वच्छ व सुंदर केला, त्याबद्दल यावेळी ह भ प श्री ढोले महाराज यांनी ग्रामपंचायतचे कौतुक केले.तुकाराम बीज च्या दिवशी तुकारामांच्या प्रतिमेचे अतिशय आनंदमय,हर्ष उत्साहाच्या वातावरणामध्ये अनावरण करणे ही भाग्याची बाब आहे असेही महाराजांनी कथन केले तसेच ठाणेदार काळे साहेब यांनी संत तुकाराम महाराज यांच्या चरित्रावर भर देऊन समाज त्यांच्या विचाराने पुढे जावा असे आवाहन केले.सूत्रसंचालन शंकर सुरतकार सर यांनी केले.






