कैलास खोट्टे जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा शहरात असलेले पोलीस स्टेशन सोनाळा येथील मा. ठाणेदार श्री.संदीप काळे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पो.कॉ. कैलास सांगळे व पो का विकास सावळे यांनी इबादुल्ला खान सनौल्ला खान रा सोनाळा यांचा हरवलेला 42,000/- रुपयेचा मोबाईल दोन दिवसांत तांत्रिक तपास करुन शोध घेऊन मोबाईल हस्तगत केला. सदरचा मोबाईल आज रोजी मुळ मालकास परत केला. या कार्याबद्दल इबादुल्ला खान सनौल्ला खान यांनी सोनाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप काळे यांचे आभार मानले.







