कैलास खोट्टे जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने शाळेत स्नेहभोजनाचा कार्यक्रम उत्साहात आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते.कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी विशेष स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना शिरा व पोळीचे स्वादिष्ट भोजन देण्यात आले. गोड व पौष्टिक शिरा तसेच गरम, मऊ पोळीचा विद्यार्थ्यांनी मनसोक्त आस्वाद घेतला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसून येत होता.या कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका कु. बोपटे मॅडम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. शंकर भाऊ कांडेलकर व सर्व शिक्षकांनी उत्कृष्ट पद्धतीने केले.यावेळी समिती सदस्य व शिक्षण तज्ञ श्री. चंद्रप्रकाश कडू सर यांनी स्वतः विद्यार्थ्यांना जेवण वाढून त्यांच्याशी संवाद साधला.यावेळी बोलताना मुख्याध्यापिका कु. बोपटे मॅडम म्हणाल्या, “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे आयोजन अत्यंत आवश्यक आहे. स्नेहभोजनासारख्या कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आपुलकी, सहकार्य व सामाजिक भावना वृद्धिंगत होतात.”संपूर्ण कार्यक्रम आनंददायी वातावरणात पार पडला.







