कैलास खोट्टे जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
सोनाळा येथे संत गोरोबा काका यांची पुण्यतिथी मोठ्या श्रद्धा व भक्तिभावाने साजरी करण्यात आली. यानिमित्त गावात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरुवात संत गोरोबा काका यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर भजन, कीर्तन व प्रवचनाचा कार्यक्रम पार पडला. गावातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संतांच्या विचारांचा प्रसार केला.या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी संत गोरोबा काका यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत समाजाला त्यांच्या शिकवणीचे पालन करण्याचे आवाहन केले.कार्यक्रमानंतर महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.







