कैलास खोट्टे जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे देवाशीष लॉन मध्ये दिनांक 21 मार्च रोजी परम पूज्य श्री माताजी निर्मला देवी यांच्या १०३ व्या वाढदिवसानिमित शहरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.सकाळी 11 वाजता पूजेला सुरुवात झाली असून प्रार्थना, ध्यान व पूजन करून श्री माताजींना हार पुष्प अर्पण केले. यावेळी सगळीकडे वातावरण चैतन्यमयी झाले होते.कार्यक्रमात सहजयोग साधनेचे महत्त्व सांगण्यात आले तसेच माताजींच्या स्पिच वर आधारित मार्गदर्शन करण्यात आले. अनेक सहजयोगी यांनी उपस्थित राहून ध्यानधारणा केली आणि आत्मसाक्षात्काराचा अनुभव घेतला.यानंतर भजनाचा कार्यक्रम पार पडला,ज्यामुळे उपस्थितांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.यावेळी आयोजकांनी माताजींच्या जीवनकार्याचा आढावा घेत त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.समाजात प्रेम,शांती आणि एकतेचा संदेश पसरविण्यासाठी सहजयोग प्रचार प्रसार करणे गरजेचे असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.कार्यक्रमाच्या शेवटी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सहजयोगी यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत माताजींच्या वाढदिवसाचा आनंद साजरा केला.







