कैलास खोट्टे जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
संग्रामपूर : पत्रकारांचे हक्क, कल्याण तसेच पत्रकारितेच्या मूलभूत तत्त्वांचे संरक्षण करण्यासाठी कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय संघटना वॉइस ऑफ मीडियाच्या संग्रामपूर तालुका अध्यक्षपदी मिर मकसूद अली (मिर मुजफ्फर अली) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते पातुर्डा बु. येथील रहिवासी असून दैनिक पुण्यनगरी या वृत्तपत्राचे तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. माजी तालुका अध्यक्ष नारायण सावतकार यांच्या राजीनाम्यानंतर सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. सोमवार, दिनांक ५ जानेवारी रोजी बुलढाणा येथील पत्रकार भवनात आयोजित कार्यक्रमात व्हाइस ऑफ मीडियाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष वैभवराजे मोहिते यांनी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. या प्रसंगी वॉइस ऑफ मीडिया महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, राज्य कोर कमिटी सदस्य अरुण जैन, सिद्धार्थ आराख, ज्येष्ठ पत्रकार भाऊ भोजने, रमेश लहाने,माजी जिल्हाध्यक्ष कृष्णा सपकाळ, लक्ष्मण बगाडे, अशोक अकोटकार,सतीश वानखडे, कैलास खोट्टे, सुमेध दामधर,अमोल ठाकरे,नंदूभाऊ सिरसोले, हनुमानसिंग राजपुरोहित, सूचित धनभर, सचिन पाटील, सुनील ढगे, डॉ समीर, साबीर भाई, येऊतकर काका, विठ्ठल निंबाळकर, रवी शिरस्कर, नामदेव येऊतकर, कैलास अवचार,इसूब भाई आदी मान्यवर उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते मिर मकसूद अली यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. नियुक्तीनंतर पत्रकार बांधवांसह विविध स्तरांतून मिर मकसूद अली यांचे अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.







