कैलास खोट्टे जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथील समस्त गावकरी मंडळी व पोलीस स्टेशन सोनाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘आई-वडील, मुलं-मुली यांच्या नात्यातील सुंदर व्याख्या सांगणाऱ्या वसंत हंकारे यांचे प्रभावी व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन ४ फेब्रुवारी रोजी ४ वाजता सोनाळा येथे आयोजित केले आहे. या कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.या विशेष कार्यक्रमात सुप्रसिद्ध लेखक,कवी, व्याख्याते, समाज प्रबोधनकार वसंत हंकारे यांचे ‘आई-बाप सन्मान’ (आई बाप समजुन घेतांना) या विषयावरहृदयस्पर्शी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम बुधवार, ४ फेब्रुवारी २०२६ रोजी सायं. ४ वाजता, बस स्टँड जवळ देशमुख बाप्पू लेआऊट, सोनाळा येथे पार पडणार आहे.तरी यामध्ये गावातील नागरिक, पालक, विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.







