कैलास खोट्टे जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
शैक्षणिक गुणवत्तेत सातत्याने प्रगती करणाऱ्या पी.एम.श्री जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मुलांची शाळा, सोनाळा येथील विद्यार्थ्यांनी 2025–26 या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या IMO (International Maths Olympiad) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परीक्षेत तब्बल 33 विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल प्राप्त झाले असून 6 विद्यार्थी दुसऱ्या स्तरासाठी (Second Level) पात्र ठरले आहेत.विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळा, पालक आणि ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी विशेष सराव वर्ग घेतले, नियमित सराव चाचण्या घेतल्या आणि ऑलिम्पियाडसाठी विद्यार्थ्यांना सातत्याने प्रोत्साहित केले.शाळेच्या मुख्याध्यापिका कुमारी बोपटे मॅडम म्हणाल्या की,“ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता आहे. योग्य मार्गदर्शन, सातत्यपूर्ण सराव आणि पालकांचे सहकार्य मिळाले की हे विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नक्कीच चमकू शकतात. 33 विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल मिळणे आणि 6 विद्यार्थी दुसऱ्या स्तरासाठी पात्र होणे ही आमच्या शाळेसाठी अभिमानाची बाब आहे. पुढील स्तरासाठी आम्ही विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत व मार्गदर्शन करत राहू.”शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षकवृंद आणि पालकांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.






