कैलास खोट्टे जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे दिनांक 8 फेब्रुवारी रोजी श्री संत गजानन महाराज प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यामध्ये गेल्या सात दिवसापासून अखंड विना, काकड आरती, श्री गजानन विजय ग्रंथ, संगीतमय भागवत कथा,हरिपाठ, हरी कीर्तन सुरू होते. यामध्ये कथा प्रवक्ते ह.भ. प .श्री बळीराम महाराज ढोले वसाळी यांचे होते.तर श्री गजानन विजय ग्रंथ वाचक ह. भ.प.श्री मधुकर महाराज सांगोळे हे होते. हजारो भक्तांनी श्री संत गजानन महाराज मंदिरात दर्शनासाठी रांग लावली होती. गण गण गणात बोते चा गजर पूर्ण मंदिरातील भक्ताच्या मुखातून निघत होता.यामध्ये ह.भ.प.श्री बळीराम महाराज ढोले यांचे काल्याचे किर्तन होऊन सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.यामध्ये गजानन महाराज मंदिरातील सर्व सेवाधारी दरवर्षी प्रमाणे सेवा देण्यासाठी मंदिरात उपस्थित होते.दुपारी चार वाजता पूर्ण सोनाळा नगरीतून पालखी मिरवणूक काढण्यात आली. टाळ मृदंगाच्या गजरात सर्वांनी श्री संत गजानन महाराज यांचा जयघोष करत सर्व पुरुष,महिला लहान मुले,तरुण वर्ग यामध्ये दिसून आला.यामध्ये सर्व सोनाळा गावकरी सहभागी झाले होते.शेवटी श्री संत गजानन महाराज यांची महाआरती करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.यामध्ये कथा संयोजक ह.भ.प.श्री हरिभाऊ म्हसाये महाराज यांनी सर्व टाळकरी मंडळी तबलावादक,मृदंगवादक, गायनाचार्य यांचे आभार व्यक्त केले.







