कैलास खोट्टे जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे भाजपचे ज्येष्ठनेते स्व.विजयकुमार भुतडा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पीएमश्री जिल्हा परिषद हायस्कूलच्या प्रांगणात आज ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता वऱ्हाडी हास्य कवी संमेलन आयोजित केले आहे.’मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा’ फेम कवी अनंत राऊत, हास्यसम्राट नितीन वरणकार,संभाजी नगरच्या कवियीत्री गुंजन पाटील, वऱ्हाडी कवी प्रा.संजय कावरे, अकोलाचे गझलकार निवेदक गोपाल मापारी उपस्थित राहणार आहेत. संमेलनात महिलांना स्वतंत्र बसण्याची व्यवस्था आयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे. सोनाळा पंचकोशीतील रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आव्हान शेख मुश्ताक शेख रहेमान, प्रा. प्रवीण उन्हाळे, प्रशांत तिडके, संतोष दाभाडे, राजेश विश्वकर्मा व सोनाळा ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.







