कैलास खोट्टे जिल्हा प्रतिनिधी बुलढाना
शिवपुराण श्रवण केल्याने सर्व इच्छा पुर्ण होतात असा संदेश हभप नागेश महाराज आगलावे यांनी पातुर्डा येथे सुरू असलेल्या शिवपुराण कथा सप्ताह प्रसंगी केले.९ ते १६ फेब्रु दरम्यान पातुर्डा येथे शिवपुराण कथेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. येथील प्राचीन पाय विहीर शिव मंदिरासमोर शिवपुराण कथेचा प्रारंभ झाला.राधाकृष्ण संस्थान पातुर्डा येथून कलश यात्रेची मिरवणूक काढून शिवमहापुराण ग्रंथाची विधिवत पूजा करण्यात आली. शिवपुराण कथेचे दुसऱ्या दिवशीचे विचार पुष्प गुंफतांना कथा वाचक महाराज पुढे म्हणाले की,शिव महापुराण कथेचे मानसिक शांतता लाभून आपल्या जीवनातील संकटांवर मात करण्याची शक्ती प्राप्त होते. शिवपुराण ग्रंथ हा एक प्राचीन व पवित्र ग्रंथ आहे.शिवपुराण कथेचा सार म्हणजे भगवान शिवाच्या भक्तीचे महत्त्व, त्याच्या शक्तीचे वर्णन, आणि त्याच्या कृपेचा लाभ घेण्याचा मार्ग आहे. धर्म कर्म व ज्ञान यांचे महत्त्व अत्यंत सोप्या पध्दतीत त्यांनी सांगितले. मर्यादित न राहता दैनंदिन जीवनात सदाचार संयम आणि भक्ती आचरणात आणण्याची गरज आहे असे ते यावेळी म्हणाले. शिवपुराण कथा वाचन दररोज दुपारी १ ते ४ यावेळेत होते. तर दररोज रात्री हरि किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. १६ फेब्रु रोजी काल्याचे किर्तन होऊन सप्ताहाची सांगता करण्यात येणार आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पातुर्डा ग्रामस्थ परीश्रम घेत आहेत.







