कैलास खोट्टे जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
संग्रामपुर तालुक्यातील वानखेड फाटा येथे बाल शिवाजी ईग्लीश स्कुल चा वर्ग ६ वी चा विद्यार्थी मिर मुजाहिद अली मिर जावेद अली याने जिल्हास्थरिय बॉक्सिंग स्पर्धेत रौप्य पदक पटकावुन ग्रामीण भागाचे नाव उंचावले ,सरस्वती कॉलेज शेगाव येथे बुलढाणा जिल्हा बॉक्सिंग अससोसिएशन द्वारा आयोजित जिल्हा स्तरीय पातूर्डा येथील इयत्ता ६ वीचा विद्यार्थी मिर मुजाहीद अली मिर जावेद अली याने वयोगट १४ वर्ष आतील ३२ ते ३४ किलो वजनगटात रौप्य पदक पटकाविले. जिल्हा बॉक्सिंग अससोसिएशन द्वारा आयोजित सब जुनिअर , जुनिअर ,सिनियर महिला व पुरुष गट बॉक्सिंग स्पर्धा यामध्ये जिल्ह्यातील विविध शेळाडूंनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. स्पर्धेत संग्रामपूर तालुका १९ सुवर्ण पदक व ५ रौप्य पदक पटकावून प्रथम राहला.यामध्ये पातूर्डा येथील इयत्ता ६ वीचा विद्यार्थी मिर मुजाहीद अली मिर जावेद अली याने १४ वर्ष वयगट आतील ३२ किलो वजनगटात रौप्य पदक पटकाविले. मिर मुजाहिद अली याने बॉक्सिंग मध्ये रौप्य पदक मिळविल्या बद्दल बालशिवाजी स्कुलचे अध्यक्ष डॉ प्रविण पाटील व संस्थेचे संचालक , प्राचार्य गायकवाड यांनी गुलपुष्प देऊन कौतुक केले तो आपल्या यशाचे श्रेय प्राचार्य प्रशांत गायकवाड, उपप्राचार्य संदिप साळुंके , शिक्षक प्रथमेश ठाकरे , भुषण वानखडे , वैभव गाडगे संग्रामपूर तालुका बॉक्सिंग प्रशिक्षक नागसेन इंगळे सह आईवडील यांना देते.







