कैलास खोट्टे जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
मुली व मुलांनो दोन मार्क कमी पडले तरी चालतील पण आपल्या आई बापाला शेवटच्या श्वासापर्यंत जीव लावा त्यांच्या प्रत्येक श्वासापर्यंत प्रेम करा कारण आई – बापाच्या श्वास निघून गेला तर भीती वरच्या फोटोतील आईबाप कधीच तुम्हाला जीव लावायला येणार नाही याची जाणीव ठेवा असे विचार सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ.वसंत हंकारे यांनी सोनाळा येथे दिनांक 4 फेब्रुवारी रोज बुधवार संध्याकाळी 4 वाजता बसस्थानक जवळ असलेल्या बापू स्टेडियमवर समस्त गावकरी मंडळी सोनाळा व पोलीस स्टेशन सोनाळा यांच्या वतीने आयोजित केलेल्या न समजलेले आईबाप समजून घेताना या विषयावर बोलताना मांडले. यावेळी या कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा परिषद कन्या शाळा च्या लेझीम पथकाने त्यांचे बहारदार स्वागत केले तसेच ढोल व ताशाच्या गजरामध्ये व फटाक्याच्या आतिश बाजी मध्ये स्वागत केल्याचे चित्र प्रांगणात दिसले. डॉ.वसंत हंकारे यांच्या कार्यक्रमा प्रसंगी 23 वर्ष देश सेवा करणाऱ्या अनिल वानखडे यांचा त्यांच्या हातून सत्कार करण्यात आला तसेच संत सोनाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी सोनाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप काळे यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकामध्ये संतोष दाभाडे यांनी संपूर्ण कार्यक्रमाविषयी रूपरेषा सांगितली तसेच वसंत हंकारे यांनी आपल्या व्याख्यानामध्ये मुला मुलींच्या आयुष्यात फक्त एकच देव आहे. तो म्हणजे आपला बाप आणि एकच देवी आहे. ती म्हणजे आपली आई आपल्या आई बापाला समजून घेण्याची वेळ आली आहे.आपल्या एखाद्या कृत्याने आई बापाची मान खाली जाईल असे कृत्य आपल्या हातून घडणार नाही याची काळजी घेण्याचे सांगत त्यांना लाचार करू नका त्यांचे नाव रोशन करण्यासाठी चांगले सत्कार मनाशी बाळगा अशी आवाहन त्यांनी मुला – मुलींना केले आहे. तुम्ही आयपीएल मध्ये रन मोजता त्याचा हिशोब ठेवता ज्या आई-बापाने आपला जन्म दिला मोठे केले अंग खांद्यावर खेळविले त्या बापाने आपल्यासाठी किती रन काढले आहे. याचा हिशोब तुम्ही कधी करणार का कारण आज हिशोब करण्याची वेळ आलेली आहे. तो तुम्हाला करावयाचा लागेल असे मुला – मुलींना त्यांनी बजावून सांगितले भविष्यात डॉक्टर,इंजिनियर, वकील, झालात आणि लाखो रुपये कमवून ठेवले मात्र ते पाहण्यासाठी जर आईबाप नसतील तर तुम्हाला त्या कमावलेल्या पैशाचा उपयोग होणार काय..? असा सवाल त्यांनी व मुला- मुलींना केला. आई-बाबांनी लहानपणी आपल्यासाठी काय केले आहे. हे तुम्हाला चांगले माहिती आहे लहानपणी आपल्याला आईबाप कळत होते. आता मात्र आम्ही कॉलेजला जायला लागलो आम्हाला बंधनात तुम्ही ठेवायला लागले असा तुमचा समज झाला आहे. त्यामुळे आई – बाबा , मम्मी पप्पा तुम्ही आम्हाला आता आवडत नाही. आय हेट यू मम्मी पप्पा अशी वाक्य मुलांच्या तोंडून येऊ लागले आहे. पण असे व्याख्यान तुमच्यासाठी परिवर्तनाचे वादळ घेऊन आले आहे.परंतु एकदा तुम्हाला तुमचे हरवलेले आईबाप यातून नक्की मिळाल्याशिवाय राहणार नाही.असा आशावाद डॉक्टर हंकारे यांनी व्यक्त केला जो निराधार त्याला आई-बापाची किंमत विचारा आई बापाची किंमत त्याला विचारा ज्याचे लहानपणीच आई बाप त्याला सोडून गेले आहेत ते तुम्हाला पूर्ण जाणीव करून देतील असे सांगत सणासुदीला आपला बाप कपड्याच्या दुकानात ज्यावेळी नवीन कपडे खरेदी करून देण्यासाठी आपल्याला घेऊन जातो त्यावेळी संपूर्ण दुकान आपले असल्याचा भास होतो कारण पाठीमागे आपला बाप असतो असेही ते यावेळी म्हणाले कार्यक्रमाचे प्रस्ताविक संतोष दाभाडे यांनी केले तर आभार सतीश वानखेडे यांनी मानले या व्याख्यान कार्यक्रमाचे भारदार व सर्वांना स्तब्ध करणारे सूत्रसंचालन गजानन नेमाळे सर यांनी केले कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सोनाळा तसेच पंचक्रोशीतील समस्त नागरिकांनी आपल्या पाल्यासह त्या ठिकाणी हजेरी लावली तसेच या कार्यक्रमासाठी समस्त सोनाळा वाशी तसेच पोलीस स्टेशन यांनी आपले अथक परिश्रम घेतले.







