कैलास खोट्टे जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथील श्री संत सोनाजी महाराज हायस्कूल मध्ये शिक्षण घेणाऱ्या वर्ग दहावी 1993 -1994 बॅचचे सर्व विद्यार्थी यांनी स्नेहसंमेलनावर होणाऱ्या अतिरिक्त खर्चावर आळा घालत,तो खर्च निधी म्हणून जमा करत, ज्या शाळेने आपला सर्वांगीण विकास घडवला त्या शाळेसाठी काहीतरी करायचं हे मनात ठरवून तो निधी शाळा विकास कार्यासाठी लावण्याचा निश्चय करत अल्पशा वेळेत एक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम शाळेमध्येच घेऊन पार पाडला.त्यासाठी श्री सोनाजी महाराज हायस्कूल सोनाळा तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री पुंडलिक पवार सर व सर्व शिक्षक वृंद यांनी विशेष सहकार्य दिले त्याबद्दल सर्वांचे आमच्या मित्रपरिवार कडून धन्यवाद.या कार्यक्रमांमध्ये बॅचचे शिक्षक श्री नरेश खर्डे सर,श्री प्रकाश ठाकरे सर, श्री पांडव सर,श्री जगन्नाथ राहणे सर यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचे शोभा वाढवली. त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद जमा झालेल्या निधीमधून शाळेसाठी प्रत्येक वर्ग खोलीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले तसेच क्रीडा साहित्य आणि स्मार्ट टीव्ही साहित्य शाळेला भेट म्हणून दिले.कार्यक्रमा मध्ये सहभागी झालेले गावचे सरपंच हर्षलजी खंडेलवाल यांनी सुद्धा आमच्या या कार्यामध्ये सहभागी होत आर्थिक निधी भेट दिली. त्यांचेही मनापासून धन्यवाद.वर्ग 10 वी बॅच 93-94संतोष तिडके,विजय हागे,मंगेश देशमुख,देविदास दिघे,महादेव आतकड,प्रदीप उमाळे,संतोष सुलताने,संदीप ठोकणे,सुभाष खलेलकर,विष्णू कांडेलकर,फकिरा जांभूळकर,विजू ठोंबरे,सुदेश पखाले,संतोष उंडे,सोनाजी सासोटे,गणेश गोतमारे,सुनील ठाकरे,आनंद भगेरिया,संतोष गायगोये, हेमंत वर्मा,अजय दालनकर,संजय राजगुरू, पुरुषोत्तम भिवटे, यांनी मोलाचे सहकार्य केले आहे.असाच सामाजिक उपक्रम सर्वांनी राबवावा असे विद्यार्थी सर्वांना संदेश देत आहेत.







