कैलास खोट्टे जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथील पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या टुणकी येथील तरुण व तरुणीचा बीएसएफ व सीआरपीएफ मध्ये निवड झाली आहे. आपल्याकडून भारत मातेचे संरक्षण व्हावे व आपण भारत देशासाठी अविरत सेवा द्यावी या प्रेरणेने सर्व तरुण वर्ग व तरुणी परिश्रम घेत असतात यातच टुणकी येथील तीन तरुण व एक तरुणी यांचे या देशाच्या कार्यासाठी निवड झाली आहे. अशी प्रेरणा प्रत्येक तरुणांना मिळाली पाहिजे याचेच अवचित्य साधून सोनाळा येथील पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप काळे यांनी त्यांना शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला. तसेच त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.







