कैलास खोट्टे जिल्हा प्रतिनिधी बुलडाणा
संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथील पोलीस स्टेशनचा मकर संक्रांति निमित्त स्तुत्य उपक्रम ठेवण्यात आला. यामध्ये नायलॉन मांजामुळे दुचाकी धारकांच्या जीवाला व मोटरसायकल वर होणाऱ्या धोक्यांची दखल घेत सोनाळा पोलीस स्टेशनच्या वतीने एक अत्यंत स्तुत्य व समाज हिताचा उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमांतर्गत नायलॉन माझ्यापासून होणारे अपघात टाळण्यासाठी दुचाकी वाहनासाठी ताराचे संरक्षणात्मक गार्ड तयार करण्यात आले. विशेष म्हणजे हे गार्ड पोलीस कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या हाताने बनवून दुचाकी धारकांना मोफत बसवून देण्यात आले. या उपक्रमाचे नेतृत्व सोनाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप काळे खुफिया विभागाचे शेंद्रे साहेब तसेच सोनाळा पोलीस स्टेशन मधील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुरू केले. केवळ कायदा सुव्यवस्था राखणेस नव्हे तर नागरिकांच्या जीवित सुरक्षेची काळजी घेणारा हा उपक्रम पोलीस जनता नात्यातील संवेदनशीलतेचे उत्तम उदाहरण ठरला आहे. सोनाळा पोलीस स्टेशनच्या या पुढाकारामुळे नागरिकांमध्ये समाधान व सुरक्षितेची भावना निर्माण झाली असून या समाज उपयोगी व मानवतावादी स्तुत्य उपक्रमाबद्दल सोनाळा पोलीस स्टेशनचे सुज्ञ नागरिकांनी कौतुक केले.







