कैलास खोट्टे जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे दिनांक 2 सप्टेंबर पासून ग्रामपंचायत विरुद्ध युवकाने एक महिना आधीच उपोषण केले होते मात्र आश्वासन पत्र देऊन त्यावर कुठल्याच प्रकारची कार्यवाही झाली नाही. मात्र पुन्हा युवकांनी दुसऱ्यांदा आमरण उपोषण सुरू केले आहे. पंचायत समितीने दुर्लक्ष करीत स्थानिक ग्रामपंचायती कुठलीही चौकशी झाली नाही म्हणून प्रशांत येते यांनी पुन्हा उपोषण मांडले आहे. सोनाळा ग्रामपंचायत मध्ये पाच गावे मिळून गट ग्रामपंचायत आहे येथे रोजगार कर्मचारी, प्रभारी सेवक,ग्रामसेवक घरकुल योजनेत यांनी घरकुल योजनेत कथित भ्रष्टाचार केला असल्याने त्यांचेवर कार्यवाही करावी या मागणीसाठी प्रशांत येथे यांनी 28 व 29 जुलै रोजी ग्रामपंचायत समोर आमरण उपोषण केले होते त्यावेळी संग्रामपूरचे व्हिडिओ यांनी सात दिवसात चौकशी करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र याबाबत कुठलीही कार्यवाही झाली नाही असा आरोप उपोषणकर्त्याने केला आहे.







