कैलास खोट्टे जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
आज दिनांक ०४/०९/२०२५ रोजी बाल गणेश उत्सव मंडळ लाडनापुर तर्फे वृक्षारोपण चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन सोनाळा पोलीस स्टेशन चे ठाणेदार मा.श्री. चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती गणेशभाऊ बावस्कार, सरपंचपती श्रीकृष्ण उमाळे, तंटामुक्ती श्रीकृष्ण अस्वार, मा. सरपंच देवमानभाऊ बोदळे संतोष सोनोने, वासुदेव सपकाळ,गजाननभाऊ हागे, ग्रा.पं. सदस्य संजुभाऊ अगडते,श्रीकृष्ण वडनेरकर (संग्रामपुर तालुका अध्यक्ष भाजपा दिव्यांग आघाडी)ग्रामपंचायत सचिव कु जें.बंधू, बाळूभाऊ सोनोने तसेच गावातील बहुसंख्य नागरीक हजर होते कार्यक्रमाचे संचालन भाजपा दिव्यांग आघाडी जिल्हा उपाध्यक्ष मा.श्री.संतोषजी चिकटे यांनी केले.







