कैलास खोट्टे जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
सोनाळा येथील प्रतिष्ठित नागरिक तथा सधन शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते गणेशभाऊ गोतमारे यांचा काल 1 सप्टेंबर रोजी वाढदिवस होता त्या निमित्त एक नवीन अभिनव उपक्रमाची सुरुवात त्यांनी केली येथील टूनकी रोड बस स्टॅन्ड जवळील स्मशान भूमी ची स्वच्छता करावी असे त्यांचे मित्र मंडळी व भाजपा संघ परिवाराच्या कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितले त्या नुसार कार्यकर्त्यांनी 1 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता एकत्रित येऊन स्वच्छतेला प्रारंभ केला.तेथील वाढलेले गवत काढले, काटेरी झाडें तोडली व हा परिसर स्वच्छ केला.गणेशभाऊ गोतमारे हे भाजपा चे ओबीसी आघाडी चे जिल्हा उपाध्यक्ष आहेत.एका अंत्यसंस्कारा चे वेळी ते स्मशानात गेले असता त्यांना तेथील स्वच्छता करावी अशी कल्पना त्यांना सुचली असा विचार त्यांच्या मनात आला त्या नुसार हा उपक्रम आपण राबवावा असे त्यांनी मित्र परिवाराला सांगून सदर स्वच्छता वाढदिवसाच्या दिवशी केली.या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी सुद्धा स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी गावातील स्मशान स्वच्छ करू असा मनोदय व्यक्त केला. यावेळी भा.ज.पा. जिल्हा चिटणीस प्रमोदभाऊ गोसावी,मा.जि.प.सदस्य प्रमोदजी खोद्रे,भाजपा शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष प्रकाश बोदडे सर,भाजपा सर्कल प्रमुख प्रदिपभाऊ भुतडा,किसान आघाडी चे संतोष भैया जैस्वाल,जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुधीरभाऊ लव्हाळे,जानराव गोरे,सत्तूभाऊ टेलर,रमेशभाऊ खोकले, प्रकाश गोतमारे,शहराध्यक्ष प्रविण ढोरे,प्रशांत येते,रवी इंगळे ऑटो युनियन चे संदिप पोटे किशोर लहुकार आदी बहुसंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.







