कैलास खोट्टे जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे दिनांक 29 सप्टेंबर रोजी विठ्ठल मंदिर संस्थान मध्ये भव्य असा भजन सप्ताह कार्यक्रम पार पडला. यामध्ये गणेश मंडळ यांनी आयोजित केलेल्या भजन कार्यक्रम मध्ये श्री संत सोनाजी महाराज महिला भजनी मंडळ यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून श्री विठ्ठल मंदिर मध्ये एक आगळावेगळा आनंद निर्माण केला. यामध्ये सर्वांनी गणेश वंदना करून महाआरती केली व सदर मंडळाची शोभा वाढवली.







