कैलास खोट्टे जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
सोनाळा येथे दै.तरुण भारत वृतपत्राचे शताब्दी निमित्ताने गणेश भाऊ गोतमारे मित्र परिवार व तरुण भारत प्रेमी मंडळी द्वारा श्री.संत सोनाजी महाराज व श्री.संत गजानन महाराज मंदिर यांची स्वच्छता व तुळस रोपणाचा कार्यक्रम सोबतच भारतीय मजदूर संघ संलग्नीत ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक मजदूर संघाच्या फलकाचे पूजन दै.तरुण भारत वृत्तपत्राचे खामगांव येथील जिल्हा प्रतिनिधी विजयराव कुलकर्णी तसेच शांताराम बोदडे,गणेशभाऊ गोतमारे,व इतर प्रमुख कार्यकर्त्यां द्वारा केली गेली.संघ परिवार क्षेत्रातील प्रमुख वृत्तपत्र म्हणून दैनिक तरुण भारत ओळखले जाते त्या अनुषंगाने या वृत्तपत्राला तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत म्हणून सदर कार्यक्रम संपूर्ण देशभर होत आहेत. हा कार्यक्रम श्री.संत सोनाजी महाराज मंदिरात 20 ऑगस्ट रोजी दुपारी 12.30 वाजता घेण्यात आला.यावेळी मंदिर स्वच्छता व तुळस रोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थिती मधे भा.ज.पा.जिल्हा चिटणीस प्रमोदभाऊ गोसावी,प्रमोद खोद्रे मा.जि.प.सदस्य सोनाळा प्रमोद खोद्रे,सोनाळा सरपंच हर्षल खंडेलवाल,भाजपा शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष प्रकाश बोदडे,भाजपा जि.प.सर्कल प्रमुख प्रदीप भूतडा,संतोष जैस्वाल,रमेश खोकले,प्रकाश गोतमारे,विनोद राठोड,भाजपा सोनाळा शहराध्यक्ष प्रविण ढोरे,तंटामुक्ती अध्यक्ष विजय राऊत,ऑटो युनियन अध्यक्ष राजू दही,उपाध्यक्ष शहजाद काझी, कार्याध्यक्ष संदिप पोटे सह सचिव किशोर लहुकार,प्रभू पारस्कार,अनिल कुकडे, संजय भटकर,प्रतिक वडोदे,रवी लव्हाळे, सुभाष डोमाळे, विजय लहुकार,रफिक भाई, शेख मोबीन, अन्वर मौलाना, शेख इरफान व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
