कैलास खोट्टे जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे दिनांक 20 ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६ वाजता भव्य दिव्य श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ सोनाळा तर्फे साजरा करण्यात आला. यामध्ये संध्याकाळी ६ वाजेपासून ९ वाजेपर्यंत हरिनाम संकीर्तन कार्यक्रम करण्यात आला. त्यामध्ये शंख अभिषेक, कृष्ण जन्मोत्सव कथा श्रीमान केशव प्रभुजी (उज्जैन) तसेच श्रीमान चरण प्रभुजी (इस्कॉन प्रचारक अकोला) यांच्यातर्फे सांगण्यात आली. सदर श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवा कृष्ण भक्त वृंद परिवार तर्फे नृत्य नाटिका सादर करण्यात आला यामध्ये श्रीकृष्ण आणि राधाची वेशभूषा घेऊन नृत्य नाटिका सादर करण्यात आली. कृष्ण भगवान यांना शृंगार एवं 56 भाऊ दर्शन चा आनंद सर्व भक्तांनी घेतला. सर्व सोनाळा गावामध्ये हरेराम हरेराम राम राम राम हरे हरे……..हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे या मंत्राचा जप सर्व भक्त जपत होते. अत्यंत शांततेत व आनंदी वातावरणात सदर कार्यक्रम पार पडला. यामध्ये सर्व भावी भक्तांनी श्रीकृष्णाची महाआरती करून शेवटी सर्वांना महाप्रसाद वाटप करण्यात आला. हे सर्व श्रेय माझे नसून संपूर्ण सोनाळा गावकऱ्यांचे यामध्ये योगदान आहे असे डॉक्टर निलेश घनोकार यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर केले.
