कैलास खोट्टे जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
दि.16/8/25 ते दि.18/8/25 दरम्यान संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा मंडळात मोठ्या प्रमाणात तर, सोनाळा,पळशी व बावनबीर मंडळात अंशता अतिवृष्टी झाली आहे.यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्या संदर्भात तातडीने पंचनामे करून शेतकरी बांधवांना मदत मिळावी यासाठी आज दि.19/8/25 ला विद्यमान तहसीलदार साहेब यांना संग्रामपूर तालुका कॉंग्रेस कमिटी तर्फे निवेदन देण्यात आले व सविस्तर चर्चा करण्यात आली.यावेळी तालुका कॉंग्रेस कमिटी चे अध्यक्ष सतीश टाकळकर,तेजराव मारोडे, संतोष राजनकार, मनोहरराव बोराखडे, राजेंद्र वानखडे, मुन्ना ठेकेदार, गणेश मानखैर,अभय मारोडे, शिवकुमार गिरी, प्रकाश साबे, मनोहर राऊत, बळिराम धुळे, स्वप्निल देशमुख, योगेश बाजोड, रंजीत गंगतीरे,दिपक गव्हांदे, विष्णू उगळकार, सोमेश कोकाटे,गुमालसिंग गारड्या, जयमाल भायड्या, गजानन ढगे, राजकुमार गोतमारे, संजय वानखडे, गणेश लोणाग्रे, संतोष टाकळकर, गजानन ढोकणे, हरिदास दामधर, डॉ झाडोकार व श़ेतकरी बांधव उपस्थित होते.
