संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी बहुल भागातील ग्राम सायखेड येथे दिनांक 14 ऑगस्ट रोजी शेती शाळा कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमाला मंडळ कृषी अधिकारी रोहिणी बोडे मॅडम यांनी सोयाबीन पिकावरील कीड रोग याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. उप कृषी अधिकारी राजू ढोरे साहेब यांनी मित्र कीड व शत्रू कीड बद्दल सविस्तर माहिती दिली शेती शाळेत प्रत्यक्ष महिलांना मित्र व शत्रू किडीची ओळख तसेच निंबोळी अर्क तयार करण्याची पद्धत सहाय्यक कृषी अधिकारी व्ही बी भोई यांनी सविस्तर मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला कृषी मित्र रमेश सुरत्ने तसेच तालुका कृषी कार्यालयातील सहाय्यक कृषी अधिकारी भाऊराव बडे व प्रदीप जाधव हे उपस्थित होते.
