कैलास खोट्टेजिल्हा प्रतिनिधी बुलढाणा खामगाव येथे दिनांक 17 ऑगस्ट रोज रविवारला सकाळी 11 वाजता ब्राह्मण सभा मंगल कार्यालय मध्ये सहजोग परिवार तर्फे श्रीकृष्ण पूजेचा भव्य दिव्य कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी यांची श्रीकृष्ण स्वरूपात पूजा करण्यात आली. यामध्ये श्रीकृष्णाचे भजन, श्री माताजींची अमृतवाणी, नंतर महाआरती करून पूजा संपन्न करण्यात आली. पूजेनंतर दहीहंडीचा कार्यक्रम थाटामाटात साजरा करण्यात आला यानंतर सर्वांना महाप्रसाद देऊन सर्व सहज योगी बंधू आणि ताईंनी ब्रह्मचैतन्याचा आनंद घेतला.सोबतच सर्व सहजयोग परिवार तर्फे भाऊ आणि बहिणीच्या बंधनाचा उत्सव म्हणजेच रक्षाबंधन कार्यक्रम सर्वानुमते साजरा केला. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर, शेगाव, संग्रामपूर, चिखली, बुलढाणा, जळगाव जामोद, मोताळा,नांदुरा येथून जास्तीत जास्त सहज योगी पूजेला उपस्थित होते.यामध्ये प्रा.किशोर खत्री,जिल्हा समन्वयक मिलिंद पाचपोळ यांनी सर्व पूजा नियोजन करून परम पूज्य श्री माताजीचे आभार मानले.
