कैलास खोट्टे
जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेंतर्गत विमा कंपनीकडून शेतकऱ्यांचे मनमानी पद्धतीने विम्याचे प्रस्ताव नाकारण्यात येत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे. संग्रामपुर तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यानी आंबिया बहार पिक विमा ऑनलाइन विमा पोर्टलवर अर्ज दाखल झाल्यानंतर शासन निर्णयानुसार २ महीण्याच्या आत शेतकऱ्याचे अर्ज मंजुर , नामंजुर करणे अनिवार्य असताना ९ महीण्याचा कालावधी संपला शेतकऱ्याना मदत वाटपाची वेळ आली पण अजुनही काही शेतकऱ्याचे अर्ज paid तर काहीचे विमा रद्द करण्याचा प्रकार चालु आहे . त्यामुळे पुन्हा एकदा विमा कंपनीचा भोंगळ कारभार समोर आला आहे. महाराष्ट्र शासनाकडून पीक विमा योजनेंतर्गत पीक विमा दिला जात आहे. यासाठी काही कंपन्यांच्या माध्यमातून ही प्रक्रिया केली जात आहे. मात्र अनेकदा पीक विमा कंपनीच्या हलगर्जीपणामुळे इतर शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे. संत्रा पीक विम्यांतर्गत नुकसानभरपाईची मंजुर झालेली हेक्टरी १ लाख रुपयाची रक्कम शेतकऱ्यांना मिळू नये, यासाठीच पीक विमा कंपनीचा खटाटोप सुरू असल्याचे चित्र आहे. कारण, शेतकऱ्यांनी निकषा प्रमाणे विमा काढला नसल्याचा दावा करत विमा कंपनीकडून शेतकऱ्यांचे प्रस्ताव नाकारले जात आहेत.शासन निर्णयातील अ. क्र.8 नुसार विमा कंपन्यांनी पिक विमा योजनेच्या संकेतस्थळावरील पी एम एफ बी वाय पोर्टलवरील शेतकरी सहभागाच्या विमा हप्ता भरून घेतल्यानंतर अंतिम दिनांक ३० नोव्हेबर २०२४ पासुन पुढील ६० दिवसाच्या आत म्हणजे ३१ जानेवारी २०२५ पर्यंत माहिती मंजुर करणे क्रम प्राप्त होते. म्हणजेच अप्रूव्हल करणे किंवा रिजेक्ट करणे वरील कालावधीत होणे अपेक्षित असताना असे न करता विमा कालावधी संपल्यानंतर ९ महिण्या नंतर प्रस्तावना कारणे हे शासन निर्णयाचे उल्लंघन आहे.
विजय हागे संत्रा उत्पादक शेतकरी लाडणापुर
