कैलास खोट्टेजिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथून जवळच असलेल्या आदिवासी बहुल भागातील सायखेड येथे दिनांक 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरा करण्यात आला.यामध्ये सर्व गावाचा समावेश होता.जागतिक आदिवासी दीवस निमित्त येथील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.यामध्ये सुत्र संचालन श्री राजेन्द्र सुरतने सर कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच पती अजय घट्टे तथा क्रांती विर जननायक तंट्या मामा भिल समीतीचे सायखेड गावातील अध्यक्ष श्री अमीत पाले उपाध्यक्ष सागर भास्कर, सचीव रोहित घट्टे, कोषाध्यक्ष सुरज सुरतने,सदस्य.संदिप घट्टे,अभिषेक जांभुळकर, अरबाज केदार,सावन भारसाकडे,राजदीप डांगरे, स्वप्निल तायडे, जय ठाकरे,हुसेन केदार, यासीन केदार तथा तंटामुक्त समीती व सर्व गांवकरी मंडळी यांच्या उपस्थितीत जागतिक आदिवासी दीवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
