कैलास खोट्टे जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
आपल्या राज्याचे मुख्यमंत्री *देवेंद्र फडणवीस* साहेब आणि आपल्या मतदार संघांचे लाडके आमदार , माजी कॅबिनेट मंत्री, जलयोद्धा. आमदार *संजयजी कुटे* साहेब यांच्या प्रती बंधू भावनेतून प्रेरीत होऊन सोनाळा येथे राखी संकल्प अभियान भाजपा महिला मोर्चा यांनी पार पाडले. भाजपा महिला तालुका महिला मोर्चाअध्यक्षा सौं गीताताई लव्हाळे, शहर महिला मोर्चा अध्यक्षा सौं श्रद्धाताई सुरळकार तालुका चिटणीस सौं ज्योतीताई खोकले, सौं अर्चनाताई देशमुख, ग्रामपंचायत सदस्या सौ.शुभांगीताई लव्हाळे, सौं स्नेहल ताई देशमुख, सौं सुलभा ताई लव्हाळे आणि इतर महिला यांनी घरोघरी जाऊन *400 राखी* आणि त्या सोबत लिहिलेले पत्राचे पाकीट *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* साहेबांना पाठविले. आणि सोनाळा पोलीस स्टेशन ला रक्षाबंधन चा कार्यक्रम घेतला. कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखणाऱ्या पोलिस बांधवांसोबत रक्षाबंधन चा कार्यक्रम आटोपल्या नंतर सोनाळा पोलीस स्टेशन चे ठाणेदार पाटील साहेब यांनी महिलांचे कौतुक केले. आणि महिलांना काही अडचण असल्यास ताबडतोब आम्हाला कडवा तुम्ही सर्व महिला आमचा पण लाडक्या बहिणीच आहात असे आश्वासीत केले. *मुख्यमंत्री लाडकी बहीण* *मुलींना मोफत शिक्षण* *उज्वला गॅस योजना* . *लखपती दिदी* अश्या भरपूर योजना महिलांना भाजपा सरकार नी दिल्या बद्दल सर्व महिलांन मध्ये आनंदाचे वातावरण आहे. अशा प्रकार भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी एक स्तुत्य उपक्रम यशस्वी पार पाडला.
