सुमेध दामधर
तालुका प्रतिनिधी संग्रामपूर
आलेवाडी : सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आलेवाडी या आदिवासी बहुल गावात जागतिक आदिवासी दीन महोत्सव दिनांक ०९ ऑगस्ट २०२५ रोज शनिवार ला मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आदिवासी युवा शक्ती मित्र मंडळ, आलेवाडी यांनी हा महोत्सव साजरा करण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. या कार्यक्रमात पारंपरिक आदिवासी वेशभूषा, नृत्य, व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात आदिवासी संस्कृती, परंपरा आणि हक्क यांवर व्याख्याने घेण्यात आली. स्थानिक मान्यवर, तरुणाई आणि ग्रामस्थ यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. या कार्यक्रमास गावातील मान्यवर, युवा वर्ग व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निमित्ताने सामाजिक ऐक्य, शिक्षणाचे महत्त्व आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेशही देण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक आदिवासी वाद्यांच्या गजरात करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी आदिवासी समाजाचा इतिहास, संस्कृती, परंपरा आणि हक्क याबाबत मार्गदर्शन केले. समाजातील एकता, शिक्षणाचे महत्त्व व संस्कृती जपण्याचे आवाहन करण्यात आले. आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणारे पारंपरिक नृत्य, गीते व लोककला सादरीकरणाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या निमित्ताने उपस्थितांनी समाजातील एकोपा व प्रगतीसाठी कार्यरत राहण्याचा संकल्प व्यक्त केला. यावेळी गावातील आदिवासी समुदायासोबत बौद्ध समाज ही या महोत्सव साजरा करण्यासाठी एकत्र आल्याचे दिसून आले. सर्व मिळून हा महोत्सव आयोजित करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
