कैलास खोट्टे जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे दिनांक 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यामध्ये समस्त आदिवासी बांधवांनी क्रांतीसुर्य बिरसा मुंडा तसेच तंट्या भिल यांच्या प्रतिमेचे पूजन केले त्यानंतर सर्व आदिवासी बांधवांनी जय आदिवासी जय बिरसा मुंडा अशा घोषणा दिल्या सर्वकडे आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.आदिवासी संस्कृती व परंपरा याची नव्या पिढीला माहिती व्हावी तसेच समाजात एकता निर्माण होऊन बंधुत्व वाढीस लागून सर्व आदिवासी बांधवांचा विकास घडावा निसर्गाची नाते अतूट राहावी याचाच या सर्व आदिवासी बांधवांनी समाजाला संदेश दिला आहे.अत्यंत दुर्गम डोंगर दर्या खोऱ्यात वास्तव करणाऱ्या आदिवासी बांधवांचा विकास व्हावा.यामध्ये सोनाळा पोलीस स्टेशन ठाणेदार श्री पाटील सर, श्री शिंबरे सर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते चंदन भाऊ कोहरे, श्री गजानन भाऊ राऊत, प्रमोद ठाकरे, साहेबराव भाऊ वाघाडे,निलेश कुमार तायडे, ज्ञानेश्वर भाऊ कोहरे, रोहित दादा राऊत, संतोष टेकाम, पंकज राऊत, प्रवीण राऊत, राजकुमार राऊत, बाबुराव नेवारे, आदित्य कोहरे, श्याम नरवाडे, संतोष धारपवार, सोनाजी शेंद्रे, शेषराव ठाकरे व सर्व आदिवासी समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे शेवटी सर्व आदिवासी बांधवांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
