कैलास खोट्टे जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
सोनाळा येथील भा.ज.पा. महिला मोर्चा व नवदुर्गा महिला मंडळा कडून महाराष्ट्रा चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राख्या पाठविण्यात आल्या. भा.ज.पा.महीला आघाडी सोनाळा कडून ‘राखी संकल्प मुख्यमंत्री भावासाठी’ या आवाहना नुसार रक्षाबंधन हा भाऊ व बहिणी चे प्रेमळ नात्याचा सण आहे त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राखी पाठविण्या चा भावनिक आणि सन्माननीय उपक्रम हाती घेण्यात आला होता.मुख्यमंत्री हे केवळ राज्या चे नेतृत्व करणारे व्यक्तीमत्व नसून लाखो भगिनी साठी ते आधारवडा सारखे भाऊ आहेत. त्यांचेप्रती प्रेम आदर् व आपुलकी राखीतून व्यक्त व्हावी हा या मागील हेतू होता.लाडकी बहिण योजने द्वारा करोडो महिलां ना देवेंद्रजी नी हा भक्कम आधार दिला आहे.सोनाळा येथे 8 ऑगस्ट ला सकाळी 11 वाजता शिक्षक कॉलोनी व शिवाजी महाराज चौकाजवळील सखी ब्युटी पार्लर येथे हा रक्षाबंधना चा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी भा.ज.पा. महिला मोर्चाच्या संग्रामपूर तालुका चिटणीस सौ.वैशाली प्रकाश बोदडे यांचे नेतृत्वात घेतलेल्या कार्यक्रमात सौ.भास्कर,सौ.पवार,सौ.घट्टे,सौ.राजनकर सौ. तळोकार, सौ.वरणकार,सौ.गोतमारे,सौ.सुलताने सौ.पेठकर,सौ.तेल्हारकर आदी बहुसंख्येने महिला वर्ग या भावनिक कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.
