कैलास खोट्टे
जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे दिनांक 3 ऑगस्ट रोजी बारा वाजेपासून ग्रामदैवत श्री संत सोनाजी महाराज येथे शंकराची पूजाअर्चा व महाआरती करून कावड यात्रेला सुरुवात झाली. मराठी महिन्याचा श्रावण मास सुरू झाला त्यामुळे शिवभक्त मनोभावे शिव पूजा करून दर्शन घेतात. सोनाळा येथील सर्व कावडधारी पूर्णा नदीतील जल आणून भगवान शंकराला भक्ती भावाने जल वाहतात. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी सर्व शिवभक्त पायी चालत भगवान शंकराचे विविध भजन करून खिरोळा नदीतील जल आणण्यासाठी मोठ्या भक्ती भावाने जात असतात. डोक्यावर कावळ मनात शिवभक्ती आणि ओठांवर हर हर महादेवाचा गजर असे हे दृश्य प्रत्येकाला अभिमान करणारे ठरते. सोनाळा येथील महाकाल ग्रुप तर्फे दरवर्षीप्रमाणे अत्यंत शांततेत शिस्तप्रिय पद्धतीने हा कावड यात्रा महोत्सव अत्यंत भक्ती भावाने साजरा होत असतो. दिनांक 4 ऑगस्ट सोमवार रोजी मोठ्या उत्साहात सर्व सोनाळा गावकरी महाकाल ग्रुप कावड यात्रेचे मोठ्या भक्ती भावाने स्वागत करत असतात.हर हर महादेवाच्या गजरात सर्व सोनाळा वासी महादेवाच्या भक्तीत रंगून जात असतात.शेवटी महाकाल ग्रुप चे अध्यक्ष गजानन शिरोडकार व उपाध्यक्ष शाम बोरपी यांनी सर्व गावकऱ्यांचे आभार व्यक्त केले.



