कैलास खो जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
श्री संत सोनाजी महाराज यात्रा उत्सव 5,6,7 नोव्हेंबर या गेल्या तीन दिवसापासून सोनाळा येथे सुरू आहे. यात्रेमध्ये हजारो भाविक दरवर्षी दर्शनाला येत असतात. यामध्ये कितीतरी केअर कचरा या तीन दिवसात सोनाजी महाराज मंदिराच्या परिसरात जमा होत असतो. मात्र दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संत सोनाजी महाराज रथोत्सव स्वयंसेवक स्वतः सर्व मंदिराच्या परिसरातील स्वच्छता करत असतात. तसेच रथाला आहार बनविण्यासाठी स्वतः शेतामध्ये जाऊन फुले एकत्रित करून ट्रॅक्टर मध्ये दरवर्षी रथोत्सवाची तयारी करत असतात. मनात कुठल्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता श्री संत सोनाजी महाराज यांची सेवा म्हणून हे रथोत्सव स्वयंसेवक दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सर्व सेवा श्री संत सोनाजी महाराज यांच्या चरणी अर्पण करत असतात. यामध्ये शंकरनाथ विश्वकर्मा अक्षय सुलताने,सागर आतकड, अंकुश दामधर,यश वडशंकर, आदित्य घोडेस्वार,दीप वळतकार सोनाजी चव्हाण, दिनेश सहस्त्रबुद्धे, प्रज्वल आतकड, शुभम दाभाडे यांच्यासह सर्व रथोत्सव स्वयंसेवक यामध्ये दरवर्षीप्रमाणे सहभाग घेत असतात







